25 February 2021

News Flash

मराठा आंदोलनाच्या ‘पॉलिटिकल मॅनेजमेंट’साठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत भेटीगाठी

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांना मिळणाऱ्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रात्रीपासून नवी दिल्लीमध्ये आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या सर्वांची भेटीही घेतल्या आहेत. मराठा समाजाचा मुंबईमध्ये निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काय काळजी घ्यायला हवी आणि मराठा समाजाच्या मागण्यांमुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पुढे कशा पद्धतीने हाताळायची, यावर बैठकींमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X