[ie_dailymotion id=x7g1di8] भारतीय चित्रपट सृष्टीतील एक मानाचं नाव म्हणजे अभिनेता नाना पाटेकर. विविध धाटणीच्या चित्रपटांतून दर्जेदार अभिनयाचा नजराणा सादर करणाऱ्या नाना पाटेकर यांना जीनवगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. बोधिसत्व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (बिफ) मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आजवर दिलेल्या योगदानाबद्दल नानांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.