[ie_dailymotion id=x7g1a6v] केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यात अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडणारे वकील राम जेठमलांनी यांचे मानधन सरकारी तिजोरीतून देण्याचा घाट दिल्ली सरकारने घातला आहे. यावरुन वाद सुरु असतानाच राम जेठमलानी यांनी मात्र केजरीवालांना दिलासा दिला आहे. केजरीवाल यांनी पैसे नाही दिले तरी मी फुकट खटला लढायला तयार असल्याचे राम जेठमलानी यांनी जाहीर केले आहे.