साताऱ्यामधील सभेतील भाषणात भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी कलम ३७० रद्द केल्याचा संदर्भ देत मोदींना लोहपुरुषाची उपमा दिली. मात्र याच उदयनराजेंनी काही वर्षांपुर्वी नोटबंदीनंतरच्या एका मुलाखतीमध्ये ‘कोण मोदी? आमच्याकडे साताऱ्याला मोदी पेढे विकतात’ असे वक्तव्य केले होते अशी आठवण अनेकांना झाली आहे.