योग प्रशिक्षक बापूसाहेब सोनवणे यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाकाने पाणी पिणे या योग अभ्यासाचे प्रात्यक्षिक करून दाखवत, नाक कशा प्रकारे तंदुरुस्त ठेवाता येते हे दाखवून दिले. आपण आपल्या नाकातील मागील भाग कधीच स्वछ करत नाही, त्यामुळे वारंवार खोकला, डोकेदुखी, सर्दी-पडसे किंवा नाकाचे इतर त्रास होतात. जलनेतीने हे त्रास दूर होतात, असे त्यांचे म्हणणे आहे.