पुणे शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता, 13 ते 23 जुलै दरम्यान कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तर शहरातील वाढती रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर वाघोली, बालेवाडी, सणस मैदान आणि हडपसर येथील gliding सेंटर या चार ठिकाणी मिळून, तीन हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.