पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानं राज्यातील राजकारण ढवळून निघालं. एकीकडे संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राठोड राजीनामा देण्याचे आदेश दिले असल्याची चर्चा सुरू असताना पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी गंभीर आरोप केला आहे.