माजी मंत्री आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे राज्यात शिव संवाद यात्रा घेत आहेत. शुक्रवारी रात्री त्यांंनी संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादेत सभा घेतली. या सभेत माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. तसेच “एका रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले?” असा प्रश्नही उपस्थित केला.
















