शरद पवार यांच्या राजीनाम्याने राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलं आहे. त्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटू लागले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड हे पुन्हा भावूक झाले. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सध्या राज्यात वादळ घोंघावत आहे. या घोंघावणाऱ्या वादळाशी लढण्यासाठी शरद पवार हे नाव
पाठीशी असलंच पाहिजे.