राज्याच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. असं असतानाच आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सूचक विधान केलं आहे. न्यायालयाने काहीही निर्णय दिला, तरी आम्ही हसत-खेळत निर्णय मान्य करू, असं ते म्हणाले आहेत. नाशिकमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.