कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे प्रमुख नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. भाजपा नेत्यांसह महाराष्ट्रात युतीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कर्नाटकात प्रचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपासह एकनाथ शिंदेवर टीकेची तोफ डागली आहे. नागपूरात ते माध्यमांशी बोलत होते.