Devendra Fadnavis: ‘एखादा अपवाद सोडला तर…’; कर्नाटकमधील निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला असून भाजपाचा पराभव झाला आहे. कर्नाटकमध्ये सत्तेच्याच्या चाव्या पुन्हा एकदा भाजपाकडून काँग्रेसकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘कर्नाटकात कुठलंच सरकार पुन्हा येत नाही. एखादा अपवाद सोडला तर तेथे दर पाच वर्षांनी सरकार बदलत असतं. यावेळी आम्ही ही परंपरा तोडू असं वाटलं होतं, पण तसं करू शकलो नाही. २०१८ मध्ये आमच्या १०६ जागा आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला ३६ टक्के मतं होती. आता आम्हाला ३५.६ टक्के मतं मिळाली आहेत. म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी म्हणजे ०.४ टक्के मतं भाजपाचे कमी झालेत’