CCTV: शटर तोडलं, काचेचा दरवाजा फोडला अन् अडीच लाखांचे दागिने लंपास; चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद
जळगावमधील चोपडा शहरातील मेन रोडवर असलेले ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ हे दागिन्यांचे दुकान रात्री सव्वातीनच्या सुमारास चोरट्यांनी फोडले. कटर वापरुन दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेमध्ये दोन ते अडीच लाखांचे चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले अशी माहिती आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे