नाशिकच्या पेठ येथील गावात गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना चक्क जीव मुठीत घेऊन खोल विहिरीत उतरून पाणी भरावं लागत आहे. आधीच उन्हाच्या दाहकते नागरिक त्रस्त आहेत. अशातच पेठमधील या पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांना रोजच्या पाण्यासाठी ही जीवघेणी कसरत करावी लागत आहे.