१६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे
आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. यासाठी ठाकरे
गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा सचिवांची भेट घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला
असता ते म्हणाले की, अध्यक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला