Zero Shadow Day: मुंबईतील ‘या’ भागांत घेता येईल शून्य सावलीचा अनुभव; दा. कृ. सोमण यांची माहिती
बुधवार १७ मे रोजी दुपारी ठाणेसह मुंबईतील अन्य काही भागांत शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. विज्ञान परिषदेतर्फे बुधवारी दुपारी १२ वाजता घंटाळी मैदान नौपाडा ठाणे येथे शून्य सावलीचं प्रात्यक्षिक दाखवून संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण व कार्यवाह प्रा. ना. द. मांडगे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत