बीडमध्ये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. येथील ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. ठाकरे गटाचे बीडमधील स्थानिक नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यात वाद झाला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमोरच या दोन नेत्यात वाद झाला आहे. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या आहेत. याबाबतचा दावा अप्पा जाधव यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत केला आहे.















