पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे जंगल वाघांसाठी प्रसिद्ध आहे. तेथील वाघ आणि त्यांच्या शिकरीचे व्हिडीओ कायमचं सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. सध्या वाघ हरिणाची शिकार करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात वाघ हरिणाला पकडायला चक्क नदीमध्ये उडी मारतो पण शेवटी हरणाच्या चपळाईमुळे वाघाची शिकार हुकते आणि हरिणाची सहीसलामत सुटका होते.