Pune: ‘नोटबंदीच्या नावानं…’; राष्ट्रवादीकडून RBI कार्यालयासमोर २ हजारांच्या नोटेला श्रध्दांजली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. या नोटा नागरिकांना ३० सप्टेबर २०२३ पर्यंत बँकेत जमा करता येणार आहेत. या निर्णयानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर २ हजार रुपयांच्या नोटेला हार घालत श्रध्दांजली वाहण्यात आली. तर या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक १० लाख रुपये किंमतीच्या २ हजार रुपयांच्या नोटा फुटपाथवर ठेवून निषेध नोंदविला.