Nana Patole: ‘काँग्रेस हाच देशाला आणि राज्याला पर्याय’; भाजपावर टीका करताना नाना पटोलेंचे वक्तव्य
‘नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात स्वागत आहे, ते जेवढे फिरतील तेवढा काँग्रेसला फायदा आहे. २०१४ पासून त्यांनी जे आश्वासन दिले आहे, त्यासंदर्भात आता ते भाषण युट्युब वर वायरल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोदी जेवढे फिरतील तेवढा काँग्रेसला फायदा होणार आहे’ असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर लगावला आहे