Ayodhya Poul: ‘तू किंवा तुझ्या गटात कोणी मर्द असेल तर…’; अयोध्या पौळ यांचं संतोष बांगरांना आव्हान
आमदार संतोष बांगर म्हणाले होते की, एक बाई आमच्याविरोधात पोस्ट टाकायची, आमच्या महिला म्हणाल्या एकदा आम्ही मारतोच तिला, तर काही पदाधिकारी म्हणाल्या तिची सोयच लावतो पण मी त्यांना रोखलं. बांगर यांच्या या वक्तव्यानंतर अयोध्या पौळ यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओद्वारे पौळ यांनी बांगर यांना थेट इजा पोहोचवून दाखवण्याचं आव्हान केलं