नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून सध्या विरोधकांकडून टीकास्त्र डागलं जात आहे. राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधानांच्या हस्ते संसद भवनाचं उद्घाटन होणार यावरून काँग्रेसने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता खासदार संजय राऊतांनी देखील पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. राष्ट्रपतींना डावलून उद्घाटन होणं ही संसदीय लोकशाहीसाठी चिंतेची गोष्ट आहे, असं राऊत म्हणाले.















