Devendra Fadnavis: ‘आता सगळे एकत्र येऊन खोटं बोलणार’; पवार-केजरीवाल भेटीवरून फडणवीसांची टीका
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज मुंबईत वाय. बी. सेंटरमध्ये भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हे कितीही एकत्र आले तरी त्याचा मोदींवर काहीही परिणाम होणार नाही. यांनी २०१९ मध्येही हे करून पाहिलं. वेगवेगळ्या राज्यांमध्येही हे करून पाहिलं. मात्र, जनता मोदींच्या पाठिशी, भाजपाच्या पाठिशी आहे. त्यामुळे लोकसभा असो की विधानसभा असो भाजपालाच पाठिंबा मिळेल”