राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे अशी जाहिरात जवळपास सगळ्या वृत्तपत्रांमध्ये मंगळवारी झळकली. त्यानंतर विविध प्रतिक्रिया आल्या आणि या जाहिरातीचे पडसादही उमटले. मात्र आज नवी जाहिरात देत हम साथ साथ है म्हणत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो एकत्र झळकवत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “बुंदसे गयी वो हौदसे नहीं आती!”















