१३ जून रोजी ‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्याची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात सुरू असतानाच १४ जून रोजी आणखी एक नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’ अशी टॅगलाईन त्याला देण्यात आलीय. विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत भाष्य करत
शिंदे गटाला टोला लगावला आहे. आधीची जाहिरात छापणारा हितचिंतक कोण? याचा खुलासा करण्याबाबतही अजित पवार म्हणाले.