गेल्या दोन दिवसांपासून वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या शिंदे गटाच्या जाहिरातवरून बराच वाद निर्माण झाला होता. शिवसेना-भाजपा युतीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू होती. यावर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. त्यानंतर पालघरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र दिसले. यावेळी भाषणात एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यातील मैत्रीच्या नात्यावर भाष्य केलं आहे.















