शिवसेना ठाकरे गटाचा आज ५७वा वर्धापन दिन साजरा होत आहे. गेल्या वर्षी याच शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्याच दिवशी पक्षातील सर्वात मोठ्या बंडाची सुरूवात झाली. शिवसेनेत गद्दार मनाचा कुणी राहिला नाही, असं ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते. आणि त्यानंतर १० दिवसातील बंडाचा रंजक प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. याच संपूर्ण घडामोडीच्या वर्षपूर्तीनिमित्त बंडाचा हा घटनाक्रम जाणून घेऊ.















