ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कांयदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर तुम्ही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का ? त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आधीच ठरलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील घडामोडींचा याच्याशी काहीही संबंध नाही, असं अजित पवार म्हणाले. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.