ठाकरे गटाचा वर्धापन दिन १९ जून रोजी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी हास्य जत्रा फेम कार्यक्रमातील कलाकारांनी आपलं सादरीकरण केलं. त्यांचा सत्कार यावेळी शिवसेनेकडून करण्यात आला. तेव्हा विनोदी कलाकार प्रसाद खांडेकर याने शिवसेनेशी त्याचं असलेलं नातं सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.











