Raosaheb Danve: भाजपाला जातीयवादी म्हणणाऱ्या विरोधकांवर दानवेंची आगपाखड; म्हणाले सगळ्यांची तोंड…
शिरूर लोकसभा मतदारसंघात आळंदी इथे रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये मोदी @९ जनसंपर्क मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपाला जातीयवादी म्हणून टीका करणाऱ्या पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. आम्हाला जातीयवादी म्हणून टीका करणारे जवळपास सर्वच पक्ष भाजपच्या पंक्तीत जेवून गेल्याची टीका दानवे यांनी केली.