Eknath Shinde on Mumbai Rain: मुंबईत साचलं पाणी; मुख्यमंत्र्यांनी टाळला विषय?, म्हणाले…
मुंबईत शनिवारी २४ जून रोजी जोरदार पाऊस झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्याच पावसात मुंबईत पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “अरे बाबा, पाऊस झालं याचं स्वागत करा. पाणी साचलं हे काय. पाऊस झाला त्यावर बोलत नाहीत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.