Sara Ali Khan: सारा अली खान बाबा महाकालच्या भक्तिरसात दंग; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
बॅालिवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकतंच उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला भेट दिली होती. साडी, हातात बांगड्या, डोक्यावर पदर घेऊन मंदिरात दर्शनासाठी आलेल्या साराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. सारा आणि विकी कौशल यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जरा हटके, जरा बचके हा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या या यशानंतर साराने महाकालेश्वर मंदिराला भेट दिली