तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर मंगळवारी (२७ जून) पंढरपुरात आले होते. त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांवर निशाणा साधला. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर केसीआर यांच्या महाराष्ट्रातील एन्ट्रीमुळे बरीच चर्चा रंगली आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी थेट भाजपाचंच नाव घेतलं आहे. निवडणुकीत मविआला त्रास देण्यासाठी भाजपाकडून केसीआर यांचं प्रयोजन करण्यात आलं आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.















