सोलापूरमध्ये आज (२९ जून) बकरी ईदच्या दिवशी धक्कादायक प्रकार घडला आहे. स्थानिक ईदगाह मैदानावर ज्याठिकाणी मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी येतात तिथे ‘लव्ह पाकिस्तान’ असं लिहिलेले फुगे विकले जात होते. नमाज पठण झाल्यानंतर तिथे फुगेवाले ‘लव्ह पाकिस्तान’ असं लिहिलेले फुगे विकत असल्याचं लक्षात आलं. सदर फुगे विकणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.