विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला बुलढाणा येथील पिंपळखुटा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातात २५ जण ठार झाले आहेत. डिव्हायडरला धडकली. त्यानंतर बसचा टायर फुटून ती उलटली आणि बसला आग लागली. या आगीत होरपळून २५ प्रवासी ठार झाले आहेत. हा अपघात नेमका झाला कसा हे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सविस्तर सांगितलं.