उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवारांच्या नावाचा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकारणात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे पवार आणि फडणवीस पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावर “माझी गुगली त्यांना कळलीच नाही. माझ्या गुगलीवर ते आऊट झाले. त्यांना ते कसं कळणार” असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.


















