Sanjay Raut: ‘अपघातातील कुटुंबांची जबाबदारी कोण घेणार?’ ;बुलढाण्यातील अपघातावरून राऊतांचा सवाल
शनिवारी रात्री दीडच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. याविषयी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “संपूर्ण समृद्धी महामार्गाचे पुन्हा एकदा तांत्रिक तपासणी केली पाहिजे. राजकीय श्रेय घेण्यापेक्षा अपघात का होत आहे? हे पाहणं गरजेचं आहे. गेल्या काही महिन्यात ३०० पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. याआधी जे अपघात झाले त्याचे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देवेंद्र फडणवीस आपल्यावर दाखल करून घेणार का? या आधी अनेक कुटुंब या ठिकाणी अपघातात उध्वस्त झाली. त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय