Ajit Pawar: अजित पवार राजभवनावर दाखल, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदारही राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.