अजित पवारांचे बंड आणि राज्यातील पुढील राजकीय घडामोडींची शक्यता यावर गिरीश कुबेर यांचे विश्लेषण!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा आणि सरकारमध्ये थेट सहभागी होणं हा एक ‘राजकीय भूकंप’ आहे अशी चर्चा सर्वत्र होताना पाहायला मिळते आहे. या संपूर्ण राजकीय बंडावर आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांवर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण!