राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी निघाले आहेत.आमदार रोहित पवार, खासदार वंदना चव्हाण, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सोबत आहेत.