Rohit Pawar: ‘अजितदादांच्या बाबतीत मी भावनिक आहे, ते माझे काका आहेत’; रोहित पवारांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान ‘अजित पवारांच्या बंडाची कल्पना होती का?’ असा प्रश्न पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांना विचारला त्यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘शिवसेना पक्ष भाजपाने फोडला तसा राष्ट्रवादी पक्षही फोडणार याचा अंदाज होता. अजितदादांच्या बाबतीत मी भावनिक आहे, ते माझे काका आहेत