अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह भाजपा-शिंदे गटाच्या महायुतीत सामील झाले आहेत. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी देखील अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून आता ठाण्यातील अध्यक्ष पदाची धुरा सुहास देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली होती. पदभार स्वीकारल्यानंतर सुहास देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला.