अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत देखील दोन गट पडल्याची चर्चा आहे. शरद पवार की अजित पवार नेमकं कोणाबरोबर जाणार असा पेच राज्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली आहे.











