सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं चित्र आहे. एक गट अजित पवार यांना समर्थन देत आहे.
तर दुसरा गट आपण शरद पवारांबरोबर असल्याचं म्हणत आहे. या पार्श्वभूमीवर आज ५जुलै रोजी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या दोन बैठका पार पडत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील बैठक वांद्रे येथील एमईटीमध्ये पार पडली. यावेळी अजित पवार यांनी २०१४, २०१७ आणि २०१९ च्या निवडणुकांचा दाखला देत मोठा गौप्यस्फोट केला.