महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ५ जुलैला उशिरा रात्री बैठक पार पडली. बैठकीत शिवसेनेचे आमदार, खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार हे महायुतीत सामिल झाल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. यावर शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका मांडली.
















