वर्षभरापूर्वी शिंदे गट ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडला त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सगळ्या राजकारणात मतदार म्हणून सामान्य नागरिकांच्या भावना काय आहेत? हे सर्व विंदा करंदीकरांच्या “सब घोडे बारा टक्के” या कवितेतून जणू आपल्या डोळ्यासमोर येतात.










