राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यानंतर अजित पवारांसह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान या मंत्रिमंडळाचा विस्तारात शिंदे गटातील आमदारांना संधी देण्यात आली नाही. यावरून उध्दव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी खोचक शब्दात टीका केली आहे.























