ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. त्या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या वतीने नितेश राणे यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात राज्य समन्वयक शामिभा पाटील,निकिता मुखदल या सहभागी होऊन नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.















