राज्यात गेल्या काही दिवसांपासून अर्थखात्याचा घोळ चर्चेचा विषय ठरला होता. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना अर्थखातं हवं असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळेच खातेवाटप तब्बल दोन आठवडे लांबल्याचंही बोललं गेलं. अखेर शुक्रवारी दुपारी खातेवाटपाची घोषणा करण्यात आली. यासंदर्भात आता विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर व विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं जात आहे. यासंदर्भात नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे.














