गेल्या महिन्यात देशभरातील विरोधी पक्षनेत्यांची पाटण्यात बैठक पार पडली होती. त्यानंतर विरोधी पक्षांची बैठक आता बंगळुरूत होणार आहे. आज (१७ जुलै) सायंकाळपासून या बैठकीला सुरुवात होणार असून दोन दिवस ही बैठक असेल. मात्र, या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे. त्यावर खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे.















